गणित शिक्षणात नवचैतन्य : श्री. मो. सो. विद्यालय बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन येथे आशिर्वाद फाउंडेशनची मॅथ्स प्रीमियर लीग

गणित शिक्षणात नवचैतन्य : श्री. मो. सो. विद्यालय बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन येथे आशिर्वाद फाउंडेशनची मॅथ्स प्रीमियर लीग

उपक्रमाचा मुख्य उद्देश :
विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भीती दूर करून त्यांच्यात गणिताची आवड निर्माण करणे, गणिताचा पाया भक्कम करणे तसेच विचारशक्ती, तार्किक क्षमता व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे हा या मागचा हेतू होता. शिक्षणासोबतच आनंददायी शिकण्याची संस्कृती रुजवणे.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे असा होता. याच बरोबर अशा स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

या मॅथ्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील जनता शिक्षण संस्था संचलित- श्री. मो. सो. विद्यालय बोर्ली, आदगाव, भरडखोल, मेंडदी अशा 5 शाळांमधील इयत्ता सातवी ते नववी च्या शंभरहून जास्त विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले, गणित हे केवळ अभ्यासाचे विषय न राहता आनंददायी, सोपे आणि आत्मविश्वास वाढवणारे कसे बनू शकते, याचा अनुभव यावेळेस विद्यार्थ्यांना आला.

स्पर्धेचे स्वरूप हे खेळाच्या धर्तीवर ठेवण्यात आले होते, प्रश्नमंजुषा, गणितीय कोडी, वेग व अचूकतेवर आधारित फेऱ्या अशा विविध टप्प्यांतून ही लीग पार पडण्यात आली. सर्व शाळांचे एकाहुन अधिक संघ बनवण्यात आले होते आणि विजेत्या संघांच्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.