भाषा, आत्मविश्वास, वक्तृत्व, आणि भवितव्य यांची सांगड घालण्याचा आशीर्वाद फॉउंडेशन चा प्रयोग

भाषा, आत्मविश्वास, वक्तृत्व, आणि भवितव्य यांची सांगड घालण्याचा आशीर्वाद फॉउंडेशन चा प्रयोग

दि. 21 नोव्हेंबर रोजी आशिर्वाद फाउंडेशनतर्फे श्री मोहनलाल सोनी विद्यालय, बोर्ली पंचतन येथे भव्य इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सातवी (VII) आणि आठवी (VIII) अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषे बद्दलची भीती कमी करुन आवड कशी निर्माण करता येईल तसेच वक्तृत्व कौशल्य, आत्मविश्वास, भाषिक अभिव्यक्ती आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
इयत्ता 7वी साठी- ‘My dream career & how I will achieve it’ हा विषय देण्यात आला होता. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयी महत्वाकांक्षा निर्माण होणे, आत्मपारीक्षण, स्वतःची आवड ओळखणे हा होता. आणि इयत्ता 8 वी साठी ‘Role of technology in our future’. निवडण्यात आला होता. या मागे उद्देश असा होता कि विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी ओळखणे, नवीन टेकनॉलॉजि चा वापर करुन मानवी जीवन अजून किती सुखकर करता येईल, तसेच विविध क्षेत्रात टेकनॉलॉजि मुळे भविष्यात होणारा बदल व संधी या गोष्टींचा अभ्यास करणे हा होता.

या कार्यक्रमात जनता शिक्षण संस्थे अंतर्गत असणाऱ्या बोर्ली मराठी मेडीयम आणि इंग्लिश मेडीयम, भरडखोल, मेंडदी, आदगाव या 5 हायस्कूल मधील एकूण 32 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्या मागे जनता शिक्षण संस्था कमिटी, श्री. संदिप पाटील सर आणि प्राचार्य श्री. यळमंते सर यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच श्री. अमित पाटील सर, श्री. विशाल पिळनकर सर, श्री. सतीश रोटकर सर श्री. विलास भायदे सर, सौं. वैशाली भायदे मॅडम, साना खान मॅडम, मारियम बस्तादार मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडूनवक्तृत्व स्पर्धे साठी लागणाऱ्या महत्वाच्या बाबी जसे कि, स्टेज डेरिंग, आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार, स्वर चड उतार, पाठांतर, सराव, सादरीकरण यासाठी विशेष तयारी करुन घेतली.
प्राध्यापक सौ.श्रुती देसाई(M. A. Eng. Gold Medalist) हे याप्रसंगी निरीक्षक म्हणून लाभले.

या प्रसंगी आशिर्वाद फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. राजेश चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच सदस्य- निखिल रिळकर, निशांत रिळकर, कुणाल माळवदे, कपिल सूर्यवंशी, राकेश तोडणकर, मयूर कविलकर, अक्षय पयेर हे उपस्थित होते.

विजेत्यांना रोख रक्कम, चषक, प्रमाण पत्रक आणि सर्व सहभागी स्पर्धाकांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.
इ. सातवी (VII) गट – विजेते
प्रथम क्रमांक: स्वरा समीर पाडलेकर
द्वितीय क्रमांक: शृंगी सचिन किर
तृतीय क्रमांक: सर्वेश समीर सुर्वे

इ. आठवी (VIII) गट – विजेते
प्रथम क्रमांक: सान्वी नीलेश रहाटे
द्वितीय क्रमांक: तनश्री उदय गोविलकर
तृतीय क्रमांक: भूमिका चेलाराम सोळंकी
सर्व सहभागी आणि विजेत्यांचे तसेच शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!