ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आशिर्वाद फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत यंदा ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षनिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विध्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा या मागील प्रमुख उद्देश आहे.
यात श्रीवर्धन तालुक्यातील – रायगड जिल्हा परिषद शाळा शिस्ते, बोर्ली मुले आणि मुली, कापोली, दिवेअगार, कार्ले आदिवासी वाडी व श्रीवर्धन क्र. १ आणि २ अशा ८ शाळांमधील एकूण ४२५ विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
दिवेअगर येथील शाळेत 15 मुलांना वह्या आणि शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या.
तसेच शिस्ते येथील अंगणवाडी च्या ४० विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाटी पेन्सिल सेट देण्यात आला. आणि इ. ५ वी ते १२ च्या १४० मुलांना वह्या वाटप पण केले आहे.
या प्रसंगी श्रीमती. राजश्री रामकृष्ण चव्हाण, शिस्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आवश्यक असे सहकार्य लाभले आहे.
या वितरणा वेळी शिस्ते ग्रामपंचायत सरपंच श्री. चंद्रकांत चाळके आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक, आशिर्वाद फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. राजेश चव्हाण, श्री. पालवणकर सर, श्री. भायदे सर, श्री. धनावडे सर, श्री. श्रीकांत तोडणकर, शिस्ते व बोर्ली शाळा कमिटी सदस्य आणि आशीर्वाद फॉउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची परंपरा पुढेही अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. राजेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.








